Monday, 21 August 2017

 हिंगोली महाराष्ट्रातील पहिला तंत्रस्नेही जिल्हा जाहीर
                                                      आता जबाबदारी वाढली 
हिंगोली जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल.आज देशाच्या 71 व्या स्वातंत्र्य दिनी “हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील 100 टक्के शिक्षक तंत्रस्नेही झाले “असे हिंगोलीचे पालकमंत्री नामदार दिलीपजी कांबळे यांनी ध्वजवंदना नंतर च्या भाषणात जाहीर केले.
मे २०१७ मध्ये मा.राज्यपाल यांच्या हस्ते “हिंगोली जिल्ह्यातील १०० टक्के शाळा DIGITAL झाल्या “ असे घोषित केले होते.परंतु जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील कोअर ग्रुप पुढील नियोजनात गुंग होता.आता १०० टक्के शाळा DIGITAL तर झाल्या परंतु जर त्यातील शिक्षकाना जर ते तंत्रज्ञान वापरायचे ज्ञान नसेल तर ते निष्फळ होणार होते.म्हणून 15 ऑगस्ट 2017 पर्यंत हिंगोली तील 100 टक्के शिक्षक तंत्रस्नेही करणे “हे उद्धीष्ट ठरविले गेले.
तत्कालीन प्राचार्या श्रीमती जयश्री आठवले यांनी सूक्ष्म नियोजन करून बीट स्तरावर व केंद्रस्तरावर प्रत्येकी दोन दिवसांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन आखून जिल्ह्यातील 31 तंत्रस्नेही सुलभकांच्या (खाली यादी जोडली आहे )सहाय्याने जिल्हा परिषद शाळेतील एकूण ३८७० प्राथमिक शिक्षकांना नियोजनबद्धरीत्या प्रशिक्षित केले.या एकूण कार्यात सर्व सुलभक व विषय साधन व्यक्तीचे महत्वाचे योगदान राहिले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शिक्षक आपल्या शाळेतील अध्यापनात तंत्रज्ञानाचा व इंटरनेट चा प्रभावी वापर करत आहेत व याद्वारे आपला जिल्हा १०० टक्के प्रगत होण्यास मदत होत आहे. 
आज स्वातंत्र्य दिनी हिंगोली चे मा.पालकमंत्री श्री दिलीपजी कांबळे,मा.जिल्हाधिकारी श्री अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एच.पी.तुम्मोड यांनी या चळवळीसाठी तत्कालीन प्राचार्या जयश्री आठवले, सध्याचे प्राचार्य श्री गणेश शिंदे ,अधिव्याखाता श्री अंकुश ससाणे, श्रीमती शोभा मोकले,शिक्षणाधिकारी श्री दिपक चवणे (मा.),शिक्षणाधिकारी श्री शिवाजी पवार (प्रा.), यांचे कौतुक केले.व या चळवळी साठी अहोरात्र धडपडणाऱ्या जिल्हास्तरीय सुलभक श्री मुकुंद पवार व श्री विजय बांगर यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
@@@ एकच खंत राहिली @@@@@
आमच्या सोबत ज्या ३१ तंत्रास्नेही मित्रांनी धडपड केली त्यांचा वेळेअभावी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होऊ शकला नाही.त्यासाठी आपले प्राचार्य श्री शिंदे सर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धडपड केली परंतु दुर्दैवाने सर्वांचा सत्कार या ठिकाणी होऊ शकला नाही परंतु हे सर्व तंत्रस्नेही मित्रांनी खूप धडपड केलेली आहे त्यामुळे यापुढील कार्यक्रमात त्यांचा यथोचित गौरव केला जाईल असे सर म्हणाले.
हिंगोली जिल्हा तंत्रास्नेही करण्यात ज्यांचा मोलाचा हातभार लाभला असे आमचे मित्र 
१)औंढा ना.श्री रफिक अन्सारी श्री विठ्ठल शेप श्री महेश बोधने महेश आमने श्री महेंद्र ठवकर अमोल मोगल श्री दिगंबर चव्हाण 
२)सेनगाव श्री सतीश नवले ,श्री लक्ष्मन साताळकर श्री रामप्रसाद टाले श्री अनिल मस्के 
३)कळमनुरी श्री शंकर लेकुळे ,श्री राघोजी शेवाळकर श्री बालाजी थोरात श्री प्रशांत सेवनकर श्री सुधाकर जाधव 
४)वसमत श्री श्रीकांत तोरेवार,श्री संदीप लुटे श्री अतिशकुमार जाधव श्री गजानन मनी श्री संदीप लुटे 
५)हिंगोली श्री विजयकुमार मानकर श्री कुलदीप मास्ट श्री प्रदीप घोडगे श्री राजेंद्र वाळूजकर श्री शामकुमार जैस्वाल 
कार्यक्रमानंतर 
आपल्या जिल्ह्याने १०० टक्के शाळा DIGITAL करणे तसेच १०० टक्के जि.प.शिक्षक तंत्रस्नेही करणे हि दोन महत्वाचे टप्पे पार केलेले आहेत आता आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे .
पुढील काही दिवसातच जिल्ह्याची तंत्रास्नेही वेबसाईट तयार करणे , तंत्रास्नेही HELPLINE सुरु करणे तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तंत्रास्नेही CORE GROUP तयार करून तंत्रास्नेही समस्या सोडविणे , नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे , शैक्षणिक VIDEO तयार करणे ,जिल्ह्याचे शैक्षणिक YOUTUBE CHANNEL तयार करून नवनवीन शैक्षणिक VIDEO त्यावर टाकणे , प्रगत शाळेच्या SUCCESS STORY तयार करणे ,शाळा प्रगत करण्याच्या दृष्टीने याचा योग्य आणि आवश्यक त्या ठिकाणीच वापर करणे , तंत्रस्नेही शिबीर आयोजित करणे, तंत्रस्नेही स्पर्धा आयोजित करणे असे अनेक उपक्रम राबविण्याचे पुढील पाउल टाकणे बाकी आहे 
आपणा सर्व मित्रांचा मी आभारी आहे या आपल्या सहकार्याने माझी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा व उर्जा नक्की वाढेल यात शंका नाही....
आपला मित्र 
मुकुंद पवार

Thursday, 23 February 2017

TRAINING

                     TODAY WE ENJOYED OUR TECH SAVVY TRAINING VERY MUCH , THIS TRAINING IS REALLY TOO GOOD. WE LEARN NEW TECHNIQUES FOR OUR TEACHING LEARNING PROCESS. WE LEARN EMAIL, BLOG, GOOGLE DRIVE ,VIDEO EDITING, HISTORY OF TECH SA
VVY MOVEMENT,AND SO MANY THINGS